Monday, 2 October 2017

विदर्भ-मराठवाड्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी -सर्व संकलन केंद्र तात्काळ सुरु करा -शेतकरी मिशनचे सरकारला साकडे


विदर्भ-मराठवाड्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी -सर्व संकलन केंद्र तात्काळ सुरु करा -शेतकरी मिशनचे सरकारला साकडे 
दिनांक -२ ऑक्टोबर २०१७ 
मागील वर्षी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीचे विक्रमी उत्पादन केल्यांनतर व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे हमीभावापेक्षा कमीभावात विकल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड दिल्यानंतर  यावर्षी  विदर्भ व मराठवाड्यातील ४० लाखावर शेतकऱ्यांनी सुमारे ५० लाख हेक्टर मध्ये कापसाची या नगदी पिकाची पेरणी केलेली आहे व सध्या मागील २० दिवसापासून पडत असलेल्या उन्हामुळे कापूस प्रचंड प्रमाणात फुटला असुन पहीला वेचा सीतादेवी करून घरात सुद्धा आला आहे व दसऱ्याला अनेक ठिकाणी खरेदीचा मुहूर्त झाल्याच्या वार्ता प्रकाशीत झाल्या आहेत मात्र सुरवातीला खरेदीचा भाव शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी भेरणारा आहे कारण मागील दोन वर्षांपासून सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कापुस या वर्षी जागतीक मंदीचा नावावर व्यापाऱ्यांनी सरासरी चार  हजार रुपये क्विंटल भावात खरेदी करण्यास सुरुवात केल्याने राज्य सरकारने केंद्राच्या सि सि आय व फेडरेशनची कापुस खरेदी तात्काळ सुरु करावी अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात  केली आहे . 
कापसाच्या पेरणीच्या पुर्वी जगात रुईचे भाव प्रती पौंड ८६  सेंट वर होते सरकीची भावही २४०० रुपये क्विंटल होता व अमेरीकेचा डॉलर चांगला ६८ रुपयावर होता म्हणुन भारतात कापसाच्या गाठीचे भाव २५ हजार रुपयाच्या घरात असल्यामुळे येत्या हंगामात कापुस कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये प्रती  क्विंटल राहतील या आशेने अख्या महाराष्ट्रात विक्रमी सुमारे ५० लाख हेक्टर मध्ये कापसाची या नगदी पिकाची पेरणी केलेली आहे मात्र आता रुईचे भाव प्रती पौंड ६८  सेंट वर तर  सरकीची भावही १८०० रुपये क्विंटल झाला असुन  व अमेरीकेचा डॉलर सस्ता झाला असुन ६४ रुपयावर आला आहे म्हणुन भारतात कापसाच्या गाठीचे भाव १८ हजार रुपयावर आले आहे याच वेळी स्वस्त दरात लगतच्या पाकीस्तान व बांगलादेशवरून कापसाची आवक  करण्यास  सुरुवात झाल्यामुळे भाव पाडण्यात कापडाच्या मिल मालकांना यश आले आहे अशातच सरकारने केंद्राच्या सि सि आय व फेडरेशनची कापुस खरेदी तात्काळ सुरु केली नाहीतर आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आपला कापुस मातीमोल भावात विकतील व हाच कापुस व्यापारी सालाबादप्रमाणे सि सि आय व फेडरेशनला विकतील तरी हा गोरखधंदा रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती तिवारी केली आहे . 
यावर्षी  विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु सजेटकरी आत्महत्याग्रस्त भागात   पाऊसाने वारंवार दगा दिल्याने व त्यातच बोडअळी ,गुलाबी अळी ने जबरदस्त हल्ला केल्याने अर्धे पीक खल्लास झाले आहे त्यामुळे लागवडीचा खर्च दुपट्टीने वाढला असतांना पहिलेच कर्जबाजारी असलेले शेतकरी उपासमारीला तोंड देत असुन अशा कठीण समयी भारताच्या लाडक्या संवेदनशील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागवड खर्च अधिक ५० % नफा या प्रमाणे हमीभाव देऊन कापसाची व सोयाबीनची खरेदी विदर्भात तात्काळ करावी अशी मागणी भाजपला लोकसभेत व विधानसभेत खुला पाठींबा देणारे  शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सरकारला  केली आहे. 
=======================================================
========================
===========  

Tuesday, 26 September 2017

विषारी कीटकनाशकाने घेतले ८ जीव तर ४ शेतमूजरानी गमावले डोळे- शेतकरी मिशनने केली जबाबदार अधिकारी व कंपन्यांवर फौजदारी कारवाईची मागणी


विषारी कीटकनाशकाने घेतले ८ जीव तर ४ शेतमूजरानी गमावले डोळे- शेतकरी मिशनने  केली जबाबदार अधिकारी व कंपन्यांवर फौजदारी कारवाईची मागणी   
दिनांक -२६ सप्टेंबर २०१७
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख (शेतकऱ्यांच्या  समस्येचा निवारण करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मिशनचे) किशोर तिवारी यांनी केंद्र सरकारकडे विनंती केली.की  बीटी कॉटनवर मोठ्या प्रमाणात शोषक कीटक आणि गुलाबी बोंडअळी  नियंत्रित करण्यासाठी विषारी कीटकनाशके फवारणी केल्यानंतर रुग्णालयात ८ निरपराध बीटी कापूस उत्पादकांच्या अपघाती निधनाच्या घटनांवर  व  चार अधिक शेतकरी त्यांचे दृष्टी गमावून  शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यवतमाळ.उपचार करीत असल्याच्या बातम्यांची गंभीर दखल घेऊन सर्व पंडितांना मदत व दोषीत जबाबदार अधिकारी व कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारशी सरकारला केल्याची माहीती तिवारी यांनी आज दिली . 
आज मिशनने भारत सरकारच्या केंद्रीय कृषी संशोधन परिषदेला व महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव विजयकुमार व कृषी आयुक्त एस पी सिंग यांचेशी चर्चा करून सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की यावर्षी पावसाळ्यात उन्हाळापेक्षाही जास्त उकळा  होणाची  ही पहिलीच वेळ झाडांची ५ फुटावर वाढ झाल्यावर यावर्षी  असुन कापसाच्या  मोठ्या प्रमाणात शोषक कीटक आणि गुलाबी बोंडअळी  व व्हाईटफ्लायचा मोठा हल्ला होत असुन  कीटकांमुळे कापूस पीक वाचविण्याकरिता  शेतक-यांना सतत अनियंत्रित कीटकनाशकची  फवारणी करावी लागत आहे  आणि कापसाच्या पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड उन्हात सुद्धा कोणतीही खबरदारी न घेता होत असलेल्या प्रचंड फवारणीमुळे हे आठ शेतकऱ्यांचे वा शेतमजुरांचे   अपघाती मृत्यूच्या  घटना घडल्या असुन या . निर्दोष आदिवासी शेतकऱ्यांच्या कटुबांना मदत देण्याचा प्रस्ताव सरकारला मिशनने दिला आहे . 
शेतकऱ्यांना व शेत मजुरांना विषारी कीटकनाशक वापरा संबंधी  आचारसंहिता प्रत्येक चावडी वाचन करण्यात येत असुन  आणि विषारी रासायनिक फवारणी, वेळ अनुसूचित, वारा दिशा,स्वछता व  शिस्तीचे संपुर्ण ज्ञाननासह अत्यावश्यक सावधगिरीची संपूर्ण माहीती न दिल्यामुळे या घटना घडलं असल्याचा आरोप तिवारी यांनी  केला असुन याला कृषी विद्यापीठ ,कृषी विभाग यांच्या विस्तार योजना मरणासन्न अवस्थेत पोचल्या असुन   आता रासायनीक शेतीचा बाजार  बहुराष्ट्रीय कंपन्या मांडून शेतकऱ्यांचा आत्महत्या व शेत मजुरांचे मुडदे पाडत  असतांना सारे राजनेते झोपले असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे . 
शेतकरी मिशनने यापुर्वी सादर केलेल्या अहवालात  म्हटले होते  की या वर्षी  कापूस उत्पादकांची परिस्थिती वाईट होऊ शकते कारण असे आढळून आले की बीटी कापूस बियाणे आता केवळ गुलाबी कृमीच्या हल्ल्याला बळी पडत नाहीत, तर चिकट्या मिलीबग  आणि नियमित  बोंडअळी माऱ्याला रक्षण करण्यास असमर्थ आहे यावर्षी कापसाच्या लागवडीखालील ४५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असल्यामुळे ही समस्या विक्राळ स्वरूप धारण करणार आहे.

शेतकऱ्यांचे व शेत मजुरांचे जीव घेणारे किटकनाशक प्राफेक सुपर हे प्रोन्नोफॉसचे ४०% + सायपरमेथ्रीन ४ % चे संयुक्त  उत्पादन असुन  याचा वापर दिलेल्या सूचनांनुसार केल्यास  सर्वसाधारणपणे अतिशय विषारी नाही परंतु विशेषज्ञ यांच्या मते  हीं बाब अकालनीय वाटत असुन  यामुळे मृत्यू होत असल्याने हे बोगस असल्याची शंका बळावत आहे कारण  प्रोएनोफोसला विषाक्तता येत आहे जेव्हा दुपारी तापमानात वाढ होते तेंव्हा  स्प्रे करण्यास मनाई आहे  कारण यामुळे  त्वचेवर रिऍक्शन होते  ,जळजळीत होणे ,चक्कर येणे, डोकेदुखी तसेच . चुकीचे प्रयोग केल्याने  किंवा कीटकनाशकांचा सेवन झाल्यामुळे मृत्यु झाल्याची कारणे समोर येत असली तरी कीटकनाशक वितरकांच्या जबाबदारी कोण निश्चित करणार  मिशन रेटले असुन जीव  गमावलेल्या सर्व कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी आणि सर्व जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाई केली गेली पाहीजेअशी मागणीसुद्धा  तिवारी यांनी केली आहे 
============================================================

Wednesday, 20 September 2017

कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करणारे ३० लाखावर अर्जदार शेतकरी नाहीत -किशोर तिवारी


कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करणारे ३० लाखावर अर्जदार शेतकरी नाहीत -किशोर तिवारी 
दि. २० सप्टेंबर २०१७ 
महाराष्ट्रातील वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व   शेतकरी चळवळीचे  कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी आज दावा केला  की राज्य शासनाने कर्जमाफीसाठीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनामध्ये  अर्ज केलेल्या ३० लाखांहून अधिक  शेतकरी फक्त नामधारी शेतकरी असुन अशा फक्त सात-बा ऱ्यावर नाम असल्यामुळे व आपली शेती मक्त्याने वा भाडेपट्टीने  दीलेल्या शेतकऱ्यांना  कर्ज माफीचा कोणताही लाभ मिळणार नाही अशी माहिती दिली . हे सर्व कथीत शेतकरी फक्त जमीनीचे कायदेशीर मालक असुन त्यांचा मुळ धंदा नौकरी ,व्यवसाय ,राजकारण ,सावकारी,वकीली ,डॉक्टरकी ,कंत्राटदारी असतांनाही खरी माहीती दडविली असल्याची माहीती तिवारी यांनी यावेळी दिली . 

यापुर्वी . महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मंगळवारी शेतकऱ्यांचे किमान १० लाख बँक खाती बनावट असल्याची खळबळजनक माहीती दिली होती त्यावर सरकारवर टीका करण्यात आली  मात्र शेतकरी मिशनच्या  अहवालामुळे ३० लाख नामधारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी लाटण्याच्या प्रकार ऐरणीवर येणार असुन  नीती आयोगाच्या  निर्देशानुसार भूमिहीन किंवा भाडेकरु शेतऱ्याना जमिनीची भाडेतत्वाचा अधिकृत दर्जा व बँकांकडून कर्ज देण्याच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. 
तिवारी यांनी दावा केला आहे की, विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागाच्या  कोरडवाहू भागात 30 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन शेतक-यांनी मक्त्याने दिल्याअसून या भाडेतत्वावर शेतीकरणाऱ्या भूमीहीन शेतकऱ्यांना कोणत्याही  प्रकारचे संस्थात्मक वा बँकांचे पीक कर्जे मिळत नाही व  या  कर्ज माफी अंतर्गत त्यांचा समाविष्ट झाला नसल्यामुळे  अशा प्रकारचे ३० लाखावर  भूमीहीन शेतकरी वंचित राहणार असतांना जे नामधारी शेतकरी कायदेशीर मालक असल्यामुळे कर्ज माफीसाठी अर्ज केला असुन हेच थोतांड शेतकरी तात्काळ  कर्जमाफीची मागणी करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . 

अलिकडेच महसूल मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी  म्हटले आहे की, मागील आराखड्यानुसार, कर्ज माफी योजनेतून ९८  लाख शेतक-यांना लाभ मिळण्याची अपेक्षा होती. .. आता आम्हाला कळले आहे की शेतकऱ्यांची सुमारे १० लाख बँक खाती बनावट आहेत, त्यातील बहुतेक बँक किंवा पतसंस्था यांनी कर्जाची रक्कम काढून टाकण्यासाठी उघडली आहे.आता या नवीन सॉफ्टवेअरसह, आपण खरी शेतकरी शोधू शकतो प्रत्यक्षात काही शेतीची जमीन आहे आणि काही कर्जे घेतल्या आहेत आणि या बनावट खातींमध्ये वास्तविक जमीन क्षेत्र, आधार कागदपत्रे, बँक खाते, इतर काही गोष्टी गहाळ आहेत. सविस्तर माहिती हवी आहे, आम्हाला कळले की सुमारे १० लाख बँक खाती नकली आहेत, म्हणून त्यांना कोणतेही कर्ज माफी फायदे मिळणार नाहीत, असे पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

शेतकरी चळवळीचे  कार्यकर्ते किशोर तिवारी पुढे म्हणाले, "राज्य सरकारला हे बनावट खाते गोठविण्यासच थांबवू नयेत. मात्र त्यांनी हे कसे तयार केले आणि या खात्यांची निर्मिती कशा प्रकारे केली ते तपासावे आणि यांच्यावर  फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे . "
भूमीहीन वा भाडेपट्टीने शेतीकरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सध्या ३० टक्के असलेंतरी ह्या शेतकऱ्यांच्या  समस्या गंभीर व रास्त असल्याने सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली असुन 'आहे रे ' वर्गाच्या मलाईदार शेतकऱ्यांच्या समस्यांवर रान उभा करणाऱ्या "नाही रे" असणाऱ्या आदीवासी ,दलीत ,भटक्या समाजाच्या वंचितांसाठी कधीतरी तोंड उघडावे  अशी विनंती केली आहे . 
===================


Monday, 11 September 2017

"भ्रष्ट नेत्यांनी खाबुगीरी सोडुन जनतेची सेवा करावी " या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे शेतकरी मिशन कडुन स्वागत

"भ्रष्ट  नेत्यांनी खाबुगीरी सोडुन जनतेची सेवा करावी " या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे शेतकरी मिशन कडुन स्वागत 

दिनांक १२ सप्टेंबर २०१७
http://www.dnaindia.com/mumbai/report-dna-exclusive-devendra-fadnavis-fires-a-warning-shot-2544548

आघाडी सरकारच्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांप्रमाणे भाजपच्या सरकारमधील मंत्री ,खासदार व आमदारांच्या झटपट संपत्ती गोळा करण्याच्या खाबुगीरी करण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे व्यथीत झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भाजपा कार्यकारीणीच्या पदाधीकारी व विस्ताराकांच्या बैठकीत  आपला कारभार सुधारा नाहीतर बाहेरची वाट धरा ह्या निर्वाणीच्या इशाऱ्याचे शेतकरी मिशनचे अध्यक्ष व  भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे . 
शनीवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देतांना मागील सरकार एका नंतर एक घोटाळ्यांच्या आरोपमुळेच गेले असुन केंद्रातील व राज्यातील भाजप  सरकारकडून  भ्रष्टाचाराच्या विरोधात शून्य सहनशीलतेच्या तत्त्वावर कोणताही तडजोड होणार नाही व दोषी मंत्री ,खासदार वा आमदार कोणालाही माफ करण्यात येणार नाही म्हणून १२२ आमदार व २३ खासदारांनी आपली कामगीरी तात्काळ सुधारावी असा सज्जड समज देतांना सध्या ३९ आमदार व ११ खासदार यांनी कामगीरी असमाधानकारक असल्याच्या तक्रारी वारंवार येत असुन जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर आजही तगडा विश्वास असुन सरकारच्या योजना वंचितांना मिळण्यासाठी आपल्या व आपल्या स्वीय सहाय्यकांना आपले वर्तन विनयशील करण्याचा सज्जड समज दिल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाल्यानंतर यावर तिवारी यांनी आनंद व्यक्त करून जे खासदार, मंत्री ,आमदार आपले डझनावर विषेय कार्यकारी अधिकारी (ओ एस डी ) वा स्वीय सहाय्यकांचा बाजार लाऊन झटपट संपत्ती जमा करण्याचा जो उद्द्योग सुरु केला आहे याचा खुला विरोध तिवारी सुरु केला असून आपला त्रागा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन व्यक्त केला आहे . 

या वृत्ताप्रमाणे मुख्यमंत्र्यानी  सर्व खासदारांच्या आमदारांना वैयक्तिक अहवाल देण्यासाठी व जनतेशी निरंतर संवाद ठेवण्यासाठी दौरे करून सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय राखण्याचे प्रयत्न करण्याची  मुख्यमंत्र्यांची इच्छा व्यक्त केली. , खासदार आणि आमदारांनी आपापल्या मतदारसंघात युद्धस्तरावर काम करून मतदारांचे आत्मविश्वास जिंकणे व  त्यांनी पक्षाच्या संघटनेला बूथ स्तरावर आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे व सरकारच्या सर्व विकासाच्या अनेक योजनांवर  लाभ वंचितांना व शेतकऱ्यांना देण्याच्या सूचनेचे तिवारी यांनी स्वागत केले आहे . 

लोक चांगले दिवस येण्यासाठी व शेतकरी शेत मजुर आदीवासी दलीत यांच्या घरात सुखींचे दिवस येणार या आशेने सरकारे बदलतात मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे समाजसेवक व राजकीय नेते चांगले दिवस येऊ देत नाहीत . भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देशच विकण्याचा धंदा सुरु केला असुन आता जनतेला दिल्लीत नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस हाच एक आशेचा किरण असुन त्यालाही पोटभरू नेते मिटवीत असल्याचा आरोप  तिवारी यांनी केला  आहे .
Farm Task Force welcomes Mah CM warning to BJP leaders not make quick buck

Farm Task Force welcomes Mah CM warning to BJP leaders not make quick buck
Dated-11 sept. 2017 
State Farm Task force chairman and anti-corruption movement activist Kishor Tiwari today welcome   Chief Minister Devendra Fadnavis warning to his party's ministers, parliamentarians and legislators from the state against following in the Congress-NCP regime's corrupt footsteps to make a quick buck while handing out work contracts and promotions.Warning that of the incumbent 122 MLAs and 23 MPs from the Maharashtra unit of the Bharatiya Janata Party (BJP), about 39 and 11, respectively, could lose their party tickets if they did not improve their performance, he asked the leaders in no uncertain terms to shape up or ship out before the next round of polls. 
Fadnavis' caveats came in a 45-minute speech at a meeting convened by the state BJP on Saturday evening, barely two days after party legislator from Vidarbha, Raju Todsam, was accused of extortion by a local contractor. The chief minister iterated that there will be no compromise on the principle of zero tolerance against corruption.
Tiwari endorsed CM views that  "Voters continue to have faith in the leadership of Prime Minister Narendra Modi and in the BJP. However, they have serious complaints against some ministers, MPs and legislators and their personal assistants over inaction and rude behaviour. You will have to improve this or you will perish,'' Fadnavis said.
CM said the party leaders had been elected to power in the state and at the Centre after a series of scams surfaced during the Congress-NCP rule. He warned them not to go the predecessor's way and land themselves in trouble.
CM also said that non-performers might not get a nomination in the 2019 Lok Sabha and assembly elections if they failed to improve performance and their style of functioning.
Tiwari also welcome CM move askign all MPs MLAs to give them individual reports with a stern message to step up efforts to reach out to the voters through constant dialogue and tours, improve coordination at all levels and increase the pace of delivery as CM wanted party ministers, MPs and legislators to win the confidence of the voters by working with a military zeal in their respective constituencies. He asked them to focus on further strengthening the party organisation from the booth level and aggressively embark on a slew of development works.''
" farmers and deprived masses are changing the Govt.at  the center and state but corrupt leaders and babus are not allowing the requisite the change ,we hope CM warning will change the environment little bit" Tiwari added. 

Saturday, 2 September 2017

सुनील केंद्रेकर यांची बदली :कृषी आयुक्तांनी समोर आणलेल्या बियाणे . कीटकनाशके व खते कंपन्यांच्या काळाबाजार व कृषी खात्यातील भष्ट्राचाराची सि . बी. आय. मार्फत चौकशी करा -किशोर तिवारी


सुनील केंद्रेकर यांची बदली :कृषी आयुक्तांनी समोर आणलेल्या बियाणे . कीटकनाशके व खते  कंपन्यांच्या काळाबाजार  व कृषी खात्यातील भष्ट्राचाराची  सि . बी.  आय. मार्फत चौकशी करा -किशोर तिवारी  
दिनांक २ सप्टेंबर २०१७
महाराष्ट्र सरकारने कृषी आयुक्तपदावरून सुनील केंद्रेकर यांची तीन महिन्यांतच युवा व क्रीडा विभागाच्या आयुक्तपदी बदली केल्यांनतर वृत्तपत्रात आलेल्या बातम्या व कृषी आयुक्तपदावरून सुनील केंद्रेकर यांनी भारत  सरकारशी बी टी  बियाणांच्या गोरखधंद्याबाबत केलेला पत्रव्यवहार बाहेर आल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या  माहीतीप्रमाणे सध्या शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या निकृष्ट बियाणांच्या निर्माण करणाऱ्या बी-बियाणे कंपन्यांवर कारवाई करून भाव नियंत्रणात आणल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ देशातील १ कोटीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  होऊ शकतो व बी टी कापसाचे तंत्र कालबाह्य झाल्यामुळे  दुय्यम दर्जाच्या बियाणांची किंमत ८०० रुपयांवरून २०० रुपये केल्यास देशभरातील शेतकऱ्यांचे सुमारे १९ हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते तसेच  त्यामुळे सुनील केंद्रेकर यांनी जेनेटिक इंजिनीअरिंग अप्रेजल कमेटीला लिहिलेल्या पत्रात  उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यावर व निकृष्ट दर्जाचे बियाणे तयार करणाऱ्या सुमारे १५ कंपन्यांविरुद्ध कारवाईची तसेच  किटकनाशके व ठिबक सिंचन कंपन्यांही भष्ट्राचाराची केंद्रेकर यांनी सुरु केलेली चौकशीकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन या प्रकरणाची सि बी आय चौकशीची करण्याची मागणी कै वसंतराव नाईक  शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
 कै वसंतराव नाईक  शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  देखील नुकतीच बीटी कापसावर झालेल्या बोंड अळीचा हल्ल्याचा  अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था उदासीन असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली यामध्येच बी-बियाणे कंपन्यांच्या मुसक्या आवळल्यामुळेच  कृषी आयुक्तांची अवघ्या तीन महिन्यांत बदली झाल्याच्या चर्चेकडे सरकारचे लक्ष वेधले आहे कारण  या काळात केंद्रेकर यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आशीर्वाद लाभलेल्या अनेक बियाणे कंपन्यांच्या मुसक्या आवळल्या. नुजिवीडू कंपनीच्या राशी-२ बियाणावर बंदी आणल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बियाणे उत्पादन करणाऱ्या बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले यामुळेच सरकारने त्यांना पदावरून  दुर केले असा आरोप होत असल्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे कारण राशी-२ वर बंदी आणू नये, यासाठी कंपनीचे हितसंबंध जोपासणाऱ्यांकडून प्रयत्न झाले पण, त्याला न जुमानता आयुक्तांनी बंदी आणलीनंतर  हा वाद हायकोर्टात व  हायकोर्टाने कृषी आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला असल्याचा बातम्या येत आहेत तसेच बी टी कापसाची बोंडअळी रक्षक तत्व  संपुष्टात आलेल्या बियाणे उत्पादकांचा परवाना रद्द करावा किंवा असे बियाणे ८०० रुपयांऐवजी २०० रुपये प्रमाणे विकण्यात यावे या  केंद्रेकर यांनी केलेल्या सूचनांचा सरकारने तात्काळ विचार करावा असा आग्रह किशोर तिवारी केंद्र व राज्यसरकार धरला आहे . 
कृषी आयुक्तपदावरून हटविल्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी कृषी सचिव विजयकुमार यांना शेतकरी व त्यांच्या समस्या  सोडविण्यात रस  नसुन साऱ्या कृषी विभागाचा कारभार लाजलुचपत खात्यांचा चौकशी प्रलंबित असणारे   व भष्ट्राचाराचा आरोप असणारे संचालकच चालवीत असल्याचा आरोप व  कृषी सहाय्यकाच्या भरतीपासून तालुका ते राज्यस्तरावरचे सर्व पदे सतत रीक्त ठेवण्याचे पुर्ण खापर कृषी सचिव विजयकुमार यांच्या माथ्यावर फोडल्याकडे सरकारचे लक्ष तिवारी वेधले आहे . 

 Tuesday, 29 August 2017

थोतांड "मजुर सहकारी संस्थाचा " कोट्यवधींचा गोरखधंदा बंद करणार -किशोर तिवारी

थोतांड "मजुर  सहकारी संस्थाचा  " कोट्यवधींचा गोरखधंदा बंद करणार -किशोर तिवारी 
दिनांक-३०  ऑगस्ट २०१७
राज्यात कार्यरत असलेल्या मजुरांच्या  सहकारी संस्था ह्या मजुरांच्या नसुन राजकीय नेत्यांच्या पोट भरण्याचा धंदा असल्याचे सबळ पुरावे व सत्य  अनेक जिल्ह्यातील तथाकथीत मजूर संस्थाचे  सहकार खात्याने ऑडीट केल्यावर ह्या मध्ये असलेले मजुर सध्या आयकराचा भरणा करणारे राजकीय नेते असुन त्यांनी संस्थांनी केलेल्या कामावर एक दिवसही काम केल्याचे समोर आले आहे तसेच जे काम खुल्या  निविदामार्फत फक्त ७० टक्के  निर्धारीत निधीमध्ये सहज होत असतांना संस्थामार्फत हेंच काम १०० टक्के निर्धारीत निधीमध्ये करण्यात आले असुन यामध्ये कोणतीच खुली  स्पर्धा नसल्याचे स्पष्ट झाले असुन ही एक संघटीत कट रचुन अधिकारी यांच्या सहमतीने केलेला  गुन्हा असल्यामुळे   या गोरखधंद्यामध्ये शामील असलेल्या सर्व संस्थामालकांवर  फौजदारी करण्याच्या व सरकारी निधी वसुल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असुन यापुढें मजुरांच्या  सहकारी संस्थाचे  विषेय आरक्षण सर्व प्रकारच्या सहकारी व धर्मदाय संस्था ज्या मजुरांचा ,बेरोजगारांच्या ,महिलांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी काम करतात त्यांना सुद्धा आरक्षणामध्ये शामील करण्यात येणार असल्याची माहीती  तसेच सर्व मजुरांचे जॉब कार्ड व आधारकार्ड लिंकशी  करून सर्व  निधी सरळ त्यांच्या खात्यात टाकुन वापरणे आवश्यक करण्यात आल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी सर्व पुराव्यानिशी  तक्रार सादर केल्यानंतर दीली . 
                              महाराष्ट्रात जिल्याजिल्ह्यात नेत्यांनी व कंत्राटदारांनी तथाकथित मजूरसंस्था निर्माणकरुन त्यांचा एक थोतांड महासंघ निर्माण केला व आपले समांतर सरकार स्थापन करून राजरोसपणे गोरखधंदा करून सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा जुना लावत असुन खासदार ,मंत्री, आमदार हे सुद्धा ह्या समांतर सरकारला दंडवत लाऊन आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम मागत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात येत होत्या . मजूरसंस्थाचे नेते मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी -काँग्रेस पदाधिकारी होते आता भाजप -शिवसेनेचे पदाधिकारी झाले असुन सरकारी अधिकाऱ्यांवर दबाब टाकुन सरकारी तिजोरीची कोट्यवधी खुली लुट करीत असुन यामध्ये हळुहळु न्याय व्यवस्था सोडुन लोकशाहीचे सारे स्तंभ शामील होत असल्याची वेदना  किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे जवळ व्यक्त केली आहे . 
लोक चांगले दिवस येण्यासाठी व शेतकरी शेत मजुर आदीवासी दलीत यांच्या घरात सुखींचे दिवस येणार या आशेने सरकारे बदलतात मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे समाजसेवक व राजकीय नेते चांगले दिवस येऊ देत नाहीत . भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देशच विकण्याचा धंदा सुरु केला असुन आता जनतेनी  हातात मशाली घेण्याची वेळ आली असल्याची भावना तिवारी यांनी या संघटीत सहकारी संस्थांच्या गोऱ्रखंधंद्यावर टीका करतांना म्हटले  आहे . 
==================================
========================================