Wednesday, 30 December 2015

कृषी कर्जपुरवठ्याचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे, उद्योजकांना - किशोर तिवारी

कृषी कर्जपुरवठ्याचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे, उद्योजकांना - किशोर तिवारी
Dec 31, 2015
शेतकऱ्यांच्या विषयांवर काम करणाऱ्या विदर्भातील किशाेर तिवारी यांची काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या मिशनमार्फत राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये उपाययोजना राबवल्या जात आहेत. तिवारी यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँका, कर्मशियल बँकांसह विदेशी बँकांनाही कृषी कर्ज वाटपाचे ठराविक उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकाने कर्जवापटपाची लक्ष्य पूर्णही केली. मिशनने यासंदर्भात कर्जवाटपाचा 
नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आराेप दस्तुरखुद्द राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतकरी स्ववलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. स्वस्त कर्जपुरवठ्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर उद्योजकांना झाल्याचे पुरावे आपल्याकडे असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
शेतकऱ्यांच्या विषयांवर काम करणाऱ्या विदर्भातील किशाेर तिवारी यांची काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या मिशनमार्फत राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये उपाययोजना राबवल्या जात आहेत. तिवारी यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँका, कर्मशियल बँकांसह विदेशी बँकांनाही कृषी कर्ज वाटपाचे ठराविक उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकाने कर्जवापटपाची लक्ष्य पूर्णही केली. मिशनने यासंदर्भात कर्जवाटपाचा अभ्यास केल्यावर कर्जवाटपात माेठे घोटाळे झाल्याचे आढळून आले. अनेक बोगस लाभार्थी दाखवून उद्योजकांनाच कर्जवाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे बनावट गट दाखवून या गटांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यात आल्याचे प्रकार निदर्शनास आले,’ असा आराेप तिवारी यांनी केला

शेतकरी दाखवून कामगारांना कर्ज
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील उदाहरण तिवारींनी दिले आहे. या गावातील एका सोयाबीन प्लांटच्या कामगारांना शेतकरी दाखवून कोट्यवधींच्या कृषी कर्जाचा लाभ घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बहुराष्ट्रीय कंपन्या, खासगी पतसंस्थांनी या गोरखधंद्याचा फायदा उचलला, असा आरोपही तिवारी यांनी केला. अनेक ठिकाणी कागदोपत्री लक्ष्य पूर्ण करण्यातून असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कागदोपत्री शेतकरी कृषीकर्जाचा लाभार्थी ठरत असला तरी त्याला कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी त्याला सावकाराच्या दारात जावे लागते. कर्ज फेडता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो, असेही तिवारी म्हणाले.

साठ टक्के कर्ज मुंबईत 
कृषी कर्जाच्या महाराष्ट्राला देण्यात आलेल्या एकूण लक्ष्यापैकी साठ टक्के एकट्या मुंबईत गाठले गेले याकडे लक्ष वेधून तिवारी यांनी हा मोठ्या ‘संशोधना’चा विषय असल्याचे सांगितले.

कर्ज दिल्यावर मुदत ठेवी कशा
राज्यातील बँकांनी दिलेल्या कर्जवाटपाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की अनेक नागरी पतसंस्थांनी ज्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले त्यांंनी दुसऱ्याच दिवशी त्या बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवल्याचे निदर्शनास आले. राज्यभर असे प्रकार घडले असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.
===================================================